“फॅशन शो’च्या रॅम्पवर यामी गौतम

लॅक्‍मे फॅशन वीक 2019ची सुरुवात झाली आहे. या शोच्या दुस-या दिवशी अभिनेत्री यामी गौतम रॅम्पवर उतरली. मात्र, तिच्या ड्रेसमुळे ती रॅम्पवर पडता पडता वाचल्याची वाचली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लॅक्‍मे फॅशन वीक 2019च्या रॅम्पवर यामीने डिझाईनर गौरी आणि नैनिकाच्या यांच्यासाठी रॅम्पवॉक केले. गौरी आणि नैनिकाची शो स्टॉपर बनलेल्या यामीने न्यूड कलरच्या गाऊनमध्ये झकास एन्ट्री घेतली. शो स्टॉपर बनलेल्या यामीचा ड्रेस रॅम्पवर चालत असताना अचानक तिच्या पायात अडकला. यामुळे तिचा तोल गेला.

मात्र, कसेबसे तिने स्वत:ला सावरत रॅम्पवॉक पूर्ण केला. तिच्या ड्रेसमुळे ती दोन-तीनवेळा अडखळली, मात्र तिने चेहऱ्यावरचा आत्मविश्वास न धळू देता रॅम्पवॉक पूर्ण केला.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामीच्या आत्मविश्वासाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. दरम्यान, यामी गौतमचा नुकताच प्रदर्शित झालेल्या “उरी’ चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या हा चित्रपट 100 कोटींच्या क्‍लबमध्येही दाखल झाला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×