नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते सनी देओल यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. सनी देओल यांना वाय-वर्ग सुरक्षा देण्यात आली आहे, म्हणजेच त्यांच्यासोबत आता केंद्रीय सुरक्षा दलाची एक टीम असणार आहे.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयबी आणि सनी देओल यांच्या चर्चेच्या आधारे हे संरक्षण देण्यात आले आहे. कृषी कायद्यादिल्लीच्या सीमेवर मागील काहि दिवसांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याच पार्शवभूमीवर सनी देओल यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शेतकरी संघटनांनीही भाजप नेते आणि मंत्र्यांना घेराव घालण्याविषयी बोलले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील इतर राज्यांत भाजपला विरोध होत आहे.
सनी देओल हे पंजाबमधील गुरदासपूरचे भाजपा खासदार आहेत. गुरदासपूर भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे, जिथं धोका कायम आहे. त्यामुळे कृषी कायद्याच्या मुद्दय़ावरुन सनी देओल यांच्या शांततेवर प्रश्न उपस्थित झाले होते. तथापि, नंतर त्यांनी एक निवेदन जारी केले की, त्यांचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेते, सरकार शेतकर्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार आहे आणि ते शेतकर्यांच्या पाठीशी आहेत.
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी अकाली दल सोडला, मग कृषी कायद्याच्या मुद्यावर शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेक फेऱ्या झाल्याची चर्चा आहे, मात्र निकाल लागला नाही.