नवी दिल्ली : शाओमीचा चीनमध्ये आज मोठा इव्हेंट पार पडत आहे. यावेळी शाओमी कंपनी आपल्या बहुप्रतिक्षित अशा नव्या उत्पादनाची घोषणा करणार आहे. यात एमआय टीव्ही, एमआय वॉच आणि 108 मेगापिक्सेल असलेल्या फोनचाही समावेश आहे.
गेल्याच आठवड्यात शाओमीच्या एमआय वॉचचा फोटो लिक झाला होता. ऍपल वॉचशी साधर्म्य दाखवणारे हे घड्याळ असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त शाओमी आपला पहिला मेगापिक्सेल 108 असणारा Mi CC9 Pro मोबाईलही लॉंच करत आहे. हा फोन जगभरात Mi Note 10 या नावाने लॉंच होईल. 6.47 इंचाचा ऍमोलेड डिस्प्ले या फोनचा असणार आहे.
Xiaomi Mi TV 5 या टीव्हीमध्ये 4K OLED पॅनल्स असल्याची चर्चा आहे. या टीव्हीला मेटल बॉडी असणार आहे. याशिवाय इतरही फीचर्स पाहायला मिळणार आहेत. शाओमीच्या या नव्या उत्पादनाविषयी संपूर्ण माहिती लॉंचिंग इव्हेंटनंतर उपलब्ध होणार आहे.