टेनिस मानांकन यादीत मोठे फेरबदल; रॉजर फेडररची घसरण

file pic

पॅरिस – वर्षातील पहिली टेनिस ग्रॅंडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन पार पडल्यानंतर पुरुष आणि महिलांच्या मानांकन यादीत मोठे बदल झाले असून रॉजर फेडररची घसरण होत तो सहाव्या स्थानी फेकला गेला आहे तर ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला विभागाचे विजेतेपद पटकाविणाऱ्या नाओमी ओसाकाने चौथ्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

पुरुषांच्या मानांकन यादीत पहिल्या स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचने स्पर्धेचे विजेतेपद पटकाविल्याने त्याच्या एटीपी गुणांमध्ये वाढ झाली असून सध्या त्याचे गुण 10,955 गुण झाले आहेत तर दुसऱ्या स्थानी असलेल्या राफेल नदालचे 8320 गुण झाले आहेत. 2017 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारा रॉजर फेडरर अंतिम 16 च्या सामन्यांतच पराभूत झाला. त्यामुळे त्याची तिसऱ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. उपान्त्य फेरीत धडक मारणाऱ्या स्टेफानो सितीपासने तीन स्थानांची झेप घेत 12वे स्थान मिळवले आहे. तर लुकास पाउलोने 14 स्थानांची प्रगती करत 17 वे स्थान काबीज केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेपूर्वी महिलांमध्ये अग्रस्थानी असलेल्या सामोना हॅलेपचीदेखील घसरण झाली आहे तर स्पर्धेपूर्वी दुसऱ्या स्थानी असलेली अँजेलीक कर्बर आणि तिसऱ्या स्थानी असलेली कॅरोलिना वॉझनोकी अनुक्रमे 6 व्या आणि 9 व्या स्थानी फेकली गेली आहे. ऑस्ट्रेलियन ओपेनची विजेती नाओमी पहिल्या स्थानी तर उपविजेती पेट्रो कितोवा दुसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)