इंदूर – मध्य प्रदेशातील इंदूरमधील छावणी भागात राहणाऱ्या जिम ट्रेनर तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्येपु्र्वी त्याने सुसाईट नोट लिहली असून त्यामध्ये “आपल्या दोन्ही चुलत बहिणींना माझा चेहरा दाखवू नका. तसेच प्रेयसीलादेखील अंत्यसंस्कारात सहभागी करून घेऊ नका. जर माझी ही शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही तर माझी आत्मा भटकत राहील” अशा इच्छा व्यक्त केल्या आहेत.
तरुणाने त्याच्या खोलीत गळफास घेतल्याचे त्याच्या भावाच्या लक्षात आले असता त्याने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार तरुणाच्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होता. यामध्ये तो चुलत बहिणींवर निराश झाला होता.
पोलिसांना मिलालेल्या सुसाईट नोटमध्ये, त्याने स्वत:च्या इच्छेने आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. मी जे काही करीत आहे ते आनंदाने करत आहे असे देखील तरुणाने म्हटले आहे.