…असे लिहित सनाने ‘निकाह’ची बातमी केली चाहत्यांसोबत शेअर

बिग बॉस-6 मधील स्पर्धक आणि अभिनेत्री सना खानचा निकाह नुकताच झाला. सोशल मीडिया आणि बॉलीवूडशी संबंधित न्यूज पोर्टलवर तिच्या निकाहचे फोटो आणि व्हिडिओ शेअर झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी मुफ्ती अनसबरोबर तिचा निकाह झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayied Sana Khan (@sanakhaan21)

 हे दोघेही पारंपरिक वेशभुषेमध्ये दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये दोघेही लग्नाचा केक कापताना दिसत आहेत. अगदी खासगी आणि कौटुंबिक समारंभामध्ये हा निकाह झाला असल्याचे या व्हिडिओवरून दिसते आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayied Sana Khan (@sanakhaan21)

मात्र त्यापूर्वी सना खानचे नाव कोरिओग्राफर मेल्विन ल्युईसबरोबर जोडले जात होते. मात्र त्यांच्या अफेअरपेक्षा त्यांचा ब्रेकअपच जास्त गाजला होता. सनाने मेल्विन ल्युईसर मारहाण आणि फसवणुकीचे आरोप अनेकवेळा केले होते. तिने आपले दुःख सर्वांसमोर अनेकवेळेस उघड केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayied Sana Khan (@sanakhaan21)

तसेच खासगी व्हॉट्‌सऍप मेसेज देखील पुराव्यासाठी सर्वांना दाखवले होते. अलीकडेच सना खानने बॉलीवूडमध्ये ऍक्‍टिंग सोडण्याबाबत वक्‍तव्य केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayied Sana Khan (@sanakhaan21)

बॉलीवूडमध्ये तिने हिंदी बरोबर दक्षिणात्य सिनेमांमधूनही काम केले आणि त्यातील तिचे बोल्ड सीन गाजले होते. मात्र त्यानंतर तिला एकदम मानवतावादी कर्तव्यांची आठवण झाली आणि तिने बॉलीवूडला अलविदा म्हटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.