हाऊ टू किल युअर हजबंड नावाचे पुस्तक प्रसिध्द
लॉस एंजेल्स: विम्याच्या पैशासाठी आपल्या पतीचा खून केल्याबद्दल एका लेखिकेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे विशेष गोष्ट म्हणजे या लेखिकेचे हाऊ टू किल युअर हजबंड नावाचे एक पुस्तक खूप प्रसिद्ध झाले आहे. नॅन्सी क्रॉम्प्टन असे या महिलेचे नाव असून ती 71 वर्षाची आहे.
नोर्थ वेस्टर्न स्टेट ओरेगोन न्यायालयाने तिला शिक्षा सुनावताना पंचवीस वर्षे तिला पॅरोलसाठी अर्ज करता येणार नाही अशी अटही घातली आहे. नॅन्सीने जून 2018 मध्ये आपल्या पतीची हत्या केली होती त्यानंतर तीन महिन्याने तिला अटक करण्यात आले होते. नॅन्सीचा पती डॅनियलचा हजारो डॉलर्स विमा उतरवण्यात आला होता त्या विम्याच्या रकमेसाठी नॅन्सीने आपल्या पतीचा खून केला असा पोलिसांचा आरोप होता.
नॅन्सीने पतीचा खून करण्यापूर्वीच काही दिवस अलीकडे एका वेबसाइटवरून गन बॅरलची खरेदीही केली होती पण कादंबरीसाठी आपण ती खरेदी केली असल्याचा बचाव नॅन्सीने केला होता, तपासात हे गन बॅरल कोठेही सापडले नाही. नॅन्सीचा नवरा डेनियल हा शेफ होता तो ज्या संस्थेत शिकवत होता त्याच संस्थेत त्याचा खून झाला.
नॅन्सी प्रसिद्ध लेखिका असली तरी तिच्या पहिल्या काही पुस्तकांना यश मिळाले नव्हते. ‘द राँग लव्हर द रॉंग’ हजबंड ही तिची काही पुस्तके होती. 2013 मध्ये तिने हाऊ टू कील युवर हजबंड नावाचे पुस्तक लिहिले त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. पतीचा खून करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही कारण नव्हते असा बचाव नॅन्सीने घेतला होता पण न्यायालयाने तो मान्य केला नाही आणि तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.