वृद्धीमान साहा पुन्हा करोना पॉझिटिव्ह

हैदराबाद – सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टिरक्षक आणि भारतीय कसोटी संघातील फलंदाज वृद्धीमान साहा याचा करोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. साहाला आयपीएलदरम्यान करोना झाला होता. त्यानंतर तो विलगीकरणात होता.

साहाचा पहिला करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण पुन्हा चाचणीत त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठणठणीत आहे. त्याच्या शरीरात करोनाची कोणतीच लक्षणे नाहीत, असे त्याने सांगितले होते. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांत मला थकवा जाणवत होता. जराही विलंब न लावता मी विलगीकरणात गेलो. त्यादिवशी करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, परंतु मला विलगीकरणात कायम ठेवले गेले. दुसऱ्या दिवशी मला ताप येण्यास सुरुवात झाली आणि तीन दिवसानंतर करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

आता साहाचा तिसरा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयने निवडलेल्या 20 सदस्यीय संघात त्याची निवड करण्यात आलेली आहे. या दौऱ्याला जाण्यापूर्वी बीसीसीआय खेळाडूंची करोना चाचणी करणार आहे. यात करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर्स, लक्ष्मीपती बालाजी, मायकल हसी, टीम सेईफर्ट, अमित मिश्रा यांचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या 20 जणांच्या सदस्यांमधील प्रसिद्ध कृष्णाचाही अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला आहे. त्यात आता वृद्धीमानचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने भारतीय संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.