Dainik Prabhat
Monday, August 8, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

गावजत्रांमधील आखाड्यात पुन्हा रंगणार “कुस्त्यांचे फड’

by प्रभात वृत्तसेवा
February 21, 2022 | 7:52 am
A A
गावजत्रांमधील आखाड्यात पुन्हा रंगणार “कुस्त्यांचे फड’

पिंपरी – शहर परिसरातील दरवर्षी, उन्हाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या गावजत्रा आणि त्यामधील कुस्त्यांच्या फडामध्ये करोनामुळे दोन वर्षांचा खंड पडला होता. यावर्षी करोनाचे सावट कमी झाल्याने तसेच गावोगावी पुन्हा जत्रांचे हंगाम सुरू झाल्यामुळे कुस्त्यांचे फड रंगण्यास सुरुवात झाली आहे.दोन वर्षे लहान-मोठ्या पैलवानांच्या खुराकाचीही अडचण झाली होती. यंदा फड पुन्हा रंगू लागल्याने पैलवानांची कमाई सुरु झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पिंपरी चिंचवड शहर परिसरात दरवर्षी, विविध गावे आणि वाड्या-वस्त्यांवर ग्रामदैवतांच्या नावाने गावजत्रा भरतात. त्यानिमित्त, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. तसेच या बरोबरीने कुस्त्यांचे फडही रंगतात. साधारणपणे दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात आकुर्डी येथील गावजत्रेने हंगामाला सुरूवात होते. त्यानंतर, रहाटणी, काळेवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, वाकड, चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी, खराळवाडी, कासारवाडी, पिंपळे सौदागर, किवळे, पुनावळे, ताथवडे, थेरगाव, पिंपरीगाव आदी भागांत गावजत्रा होतात. यानिमित्ताने, कुस्त्यांची मैदाने भरतात. त्यामध्ये, स्थानिक आणि बाहेरचे अनेक लहान-मोठे पैलवान उतरून कुस्ती प्रेमींची मने जिंकतात. या फडात असलेल्या इनामी कुस्त्यांमधील रोख रकमेमुळे पैलवानांच्या वर्षभराच्या खुराकाची देखील सोय होते.

पैलवानांसाठी उत्पन्नाचे साधन हे केवळ कुस्ती असते. गेल्या दोन वर्षांत कुस्त्याच न झाल्यामुळे शहर परिसरातील अनेक पैलवानांना आर्थिक फटक बसला होता. जगण्याचीही अडचण झाल्याने कुस्तीप्रेमींसह पैलवानांना कुस्त्या सुरु होण्याचे वेध लागले होते. जत्रेचे हंगाम सुरू झाल्याने कुस्त्याही सुरू होऊ लागल्याने कुस्त्यांच्या माध्यमातून पैलवानांना उत्पन्न मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता कुस्तीचे फड रंगु लागल्याने पैलवान मंडळींना मोठा दिलासा मिळाला आहे.

नामवंत मल्ल गाजवताहेत गावजत्रांचा फड
महाराष्ट्र केसरी विकी बनकर, विजय चौधरी, अभिजीत कटके, बाळा रफीक शेख, विष्णू खोसे , सचिन येलभर अशा अनेक दिग्गज पैलवानांनी देखील ठिकठिकाणच्या जत्रेच्या कुस्त्या गाजविल्या आहेत. शहरातील जत्रेतील कुस्त्यांमधून 50 ते 65 किलो वजन गटातील पैलवान चांगली कमाई करतात. तर, मोठे पैलवान त्यापेक्षा मोठ्या रक्कमेचे इनाम जिंकत असतात. केवळ उत्पन्नच नव्हे तर कुस्त्यांच्या माध्यमातून पैलवानांचा मान सन्मानदेखील केला जात असल्याने पैलवानांमध्ये तसेच कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Tags: pimpari chinchwad newsWrestling

शिफारस केलेल्या बातम्या

#CWG2022 #Wrestling : भारतीय कुस्तीपटूची थाटात सुरूवात; बजरंग आणि दीपकची…
Uncategorized

#CWG2022 #Wrestling : भारतीय कुस्तीपटूची थाटात सुरूवात; बजरंग आणि दीपकची…

3 days ago
कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षीसासाठी पुढील वर्षापासून 1 कोटीचा निधी देणार -उपमुख्यमंत्री पवार
सातारा

कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षीसासाठी पुढील वर्षापासून 1 कोटीचा निधी देणार -उपमुख्यमंत्री पवार

3 months ago
ऐकावे ते नवल ! कुस्तीच्या डावासह पैलवानांने जिंकली दुभती म्हैस, पाच बकरे
पिंपरी-चिंचवड

ऐकावे ते नवल ! कुस्तीच्या डावासह पैलवानांने जिंकली दुभती म्हैस, पाच बकरे

3 months ago
पुणे : तब्बल दोन वर्षानंतर भरू लागले कुस्तीचे आखाडे
पुणे

पुणे : तब्बल दोन वर्षानंतर भरू लागले कुस्तीचे आखाडे

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“एमपीएससी’च्या परीक्षेतील “मुन्नाभाई’ला पोलीस कोठडी

“मला माध्यमांशी न बोलण्याचे आदेश “; राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांचा खुलासा

पोपटाच्या शिट्ट्या, ओरडण्याने आजोबांनी गाठले पोलीस ठाणे, पोपटाच्या मालकावर पुण्यात गुन्हा दाखल

पुण्यात डीझेलवरील 70 मिडी बसना आता सीएनजी, इलेक्‍ट्रिक किट

#CWG2022 #ParaTableTennis : पॅरा टेबल टेनिसमध्ये भाविनाला सुवर्ण तर सोनलबेनला ब्रॉंझपदक

#CWG2022 #TableTennis : टेबल टेनिसपटू शरथ-साथियनला दुहेरीत रजतपदक

महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री शिंदे

ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

गोल्डनपंचनंतर निखत झरीनची पहिला प्रतिक्रिया…

महाराष्ट्रातील 214 कैद्यांची करणार सुटका

Most Popular Today

Tags: pimpari chinchwad newsWrestling

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!