Wrestling | जागतिक कुस्ती स्पर्धेतून पुनिया, रवीची माघार

नवी दिल्ली – सराव लढतीत डोक्‍याला दुखापत झाल्याने भारताच्या सोनम मलिकला गुरुवारपासून रंगणाऱ्या संयुक्‍त जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेतून (यूडब्ल्यूडब्ल्यू) माघार घ्यावी लागली आहे.

साक्षी मलिकविरुद्धच्या सामन्यात ही दुखापत झाली आहे. तिच्यासह पुरुष गटातील भारताचे मेहनती कुस्तीपटू दीपक पुनिया व रवी दहिया यांनीही वैयक्‍तिक कारणांनी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इटली येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने 34 खेळाडूंचा संघ पाठवला असून बजरंग पुनिया व विनेश फोगट या संघाचे नेतृत्व करणार आहेत. 62 किलो वजनी गटात सोनम भारताचे प्रतिनिधित्व करणार होती.

परंतु लखनौ येथे गेल्या आठवडयात झालेल्या राष्ट्रीय शिबिरादरम्यान साक्षीविरुद्ध लढताना सोनमच्या डोक्‍याला जबर मार लागला. तिच्या डोक्‍यातून रक्‍त वाहू लागल्याने सराव तेथेच थांबवण्यात आला. पुढील तीन-चार आठवडे सोनमला विश्रांतीचे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.