पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने ६३ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या विजेतेपदाची मानाच्या गदेवर नाव कोरले आहे. हर्षवर्धन याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या किताबी लढतीत लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ असा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी झाला. तसेच हर्षवर्धनने संपूर्ण महाराष्ट्राची मनेही जिंकली.
अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लानी आज असंख्य कुस्ती शौकिनांना थरारक अनुभव दिला. दोन्ही मल्ल एकाच तालमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला मित्र व आजच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला. ही गोष्ट नेटकऱ्यांच्या मनाला चांगलीच भावली. हर्षवर्धन आणि शैलेश यांच्या मैत्रीला सोशल मीडियावर सलाम करण्यात आला आहे.
लाल सूट मधला आमच्या नासिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाला पण घमेंड नाही,म्हणूच प्रतिस्पर्ध्याला आपल्या खांद्यावर घेऊन विजयश्री चा आनंद व्यक्त केला
अभिनंदन हर्षवर्धन#म #मराठी #महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/P0Ccra9t0P
— Rofl Gandhi (मराठी) (@RoflGandhi_M) January 7, 2020
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे व त्या परंपरेत लातूरचे मोठे योगदान आहे.रुस्तम ए हिंद,महाराष्ट्र केसरी,पैलवान स्व. हरिश्चंद्रमामा बिराजदार हे तर लातूरसह संपूर्ण देशाचा अभिमान.आज पैलवान शैलेश शेळके यांनी लातूरच्या मातीचा कुस्तीतील संपन्न वारसा पुढे नेला आहे#महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/HFC1F2VeXr
— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) January 7, 2020
विजयी पैलवान पराभूत पैलवानाला खांद्यावर घेऊन आखाड्यात मिरवतो, अशी खिलाडूवृत्ती फारच दुर्मिळ, बडे दिलवाला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर !?#महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/h0SQMkCd8N
— Vaibhav kokat (@ivaibhavk) January 7, 2020
दोस्त असावा तर असा…??
सामना रंगला
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला २०२० चा महाराष्ट्र केसरी, पण कौतुक झाले वेगळ्याच कारणावरुन… विजयानंतर पराभूत मल्लाला खांद्यावर उचलून घेत हर्षवर्धनने आनंद साजरा केला…
मनापासून अभिनंदन…!
??????#महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/wuf8zQNjoU— Shital … (@shitalbankar333) January 7, 2020
#महाराष्ट्रकेसरी #हर्षवर्धन_सदगीर या कुस्तीपटूचे हार्दिक अभिनंदन.??
कुस्ती संपताच विजेत्या हर्षवर्धनने आपल्याच उपविजेत्या दोस्ताला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
काकासाहेब पवार यांच्यासाठी आजचा दिवस नक्कीच खास.??#कुस्ती #MaharashtraKesari2020 #MaharashtraKesari pic.twitter.com/Agn9g8u6y4— Prajakta Abasaheb Godase (@GodasePrajakta) January 7, 2020
हे असं फक्त महाराष्ट्राच्या भूमीतच पाहायला मिळतं
विजयी मल्ल पराभूत मल्लाला खांद्यावर घेऊन आखाड्यात मिरवतो, यालाच खिलाडूवृत्ती अन मोठया काळजाचा माणूस म्हणतात…?
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणुस ??#अभिनंदन_पहिलवान ?? #महाराष्ट्रकेसरी #म pic.twitter.com/psaA4vfDOp— नितेश परब (@Nitesh13496) January 7, 2020
हा फोटो म्हणजे मातीतील खेळात जिंकलेल्याचे पाया जमिनीवर असण्याचे मूर्तिमंत उदाहरण, हर्षवर्धन तू आज फक्त #महाराष्ट्रकेसरी जिंकला नाहीस तर महाराष्ट्राचे मन तू जिंकला आहेस. शैलेश तुझी झुंज देखील पाहण्यासारखी होती, पुढच्या वेळी तू प्रतिस्पर्धी पैलवान खांद्यावर घ्यावा ही अपेक्षा #मराठी pic.twitter.com/o8AUMz2QuF
— ज्ञानेश्वर (@dnyanaism) January 7, 2020
हर्षवर्धनने कुस्ती जिंकली…
आणि शैलेशने मन ♥️ जिंकलं…वस्ताद काका पवारांच्या तालमीतले हे दोन हिरे… ?
महाराष्ट्राची माती नातं जपायला शिकवते…
मग #राजकारण असो किंवा #खेळ… ♥️#Maharashtrakesari #महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/FjxQ9VOZas— Shailaja Shashikant Jogal (@jogalshailaja) January 7, 2020
लढलो ज्यासाठी ती ‘जिद्द’ एकच होती… कोण हरलंय हे लपवण्याची किमया फक्त पहिलवान करू शकतात. याला ताकद लागत नाही यांच्यात असतेच! #महाराष्ट्रकेसरी
? pic.twitter.com/UlttWv4nND— Akshay Kambekar (राज्यकडू) (@SunitaAkshay) January 7, 2020