ऑलिम्पिक स्पर्धेतून अमित धनकर बाहेर

कादियन, मलिकचा उपांत्य फेरीत प्रवेश

सोफिया (बल्गेरिया)  – भारतीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियन आणि सुमित मलिक यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र, पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागल्याने अमित धनकर ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

अमित धनकरला मोल्दोवच्या मिहेल सावाने 6-9 असे चितपट केले. यामुळे त्याचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले आहे. सामन्यातील पहिल्या राउंडमध्ये 0-4 अशा पिछाडीनंतर धनकरने दुसऱ्या राउंडमध्ये जोरदार वापसी केली. परंतु मोल्दोवच्या कुस्तीपटूला अस्मान दाखविता आले नाही. धनकरच्या पराभवामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनी गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

ऑलिम्पिक पात्रतेसाठीची ही अखेरची स्पर्धा असून, कादियन (97 किलो) आणि सुमित मलिक (125 किलो) यांनी आपले आव्हान कायम ठेवले आहे. कादियनने उपउपांत्यपूर्व फेरीत प्यूटो रिकोच्या इव्हान अमादौरवर 5-2 असा विजय मिळविला.

सुमितने 125 किलो वजनी गटात किरगिस्तानच्या इयाल लाझरेव्हवर अखेरच्या 25 सेकंदांत 1-2 अशा पिछाडीवर असताना अखेरच्या क्षणी एक गुण मिळवित बरोबरी साधण्यात यशस्वी ठरला. हा सामना 2-2 अशा बरोबरीत राहिल्याने अंतिम गुण मिळविल्याच्या आधारावर सुमितला विजयी घोषित करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.