गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी : शाळा, विद्यालये, मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम
पिंपरी – “गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ः गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः’ असे म्हणत अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरुंना पिंपरी-चिंचवड कामगारनगरीने आज (मंगळवारी) वंदन केले. मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आकर्षक सजावट करण्यात आली होती. शाळांमधून गुरुपूजन, गुरुंचा गौरव करण्यात आला. सामाजिक संस्था, संघटनांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
दापोडी – येथील विविध मंदिर, मठात गुरुपौणिमेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. होम हवन, पुजा, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अक्कलकोट स्वामी समर्थ मठामध्ये संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य संजय मराठे यांच्या हस्ते महाआरती तर संजय कणसे व दिपाली कणसै यांनी होमहवन व पुजा करण्यात आली. महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. महाप्रसाद अजय जाधव यांच्या वतीने देण्यात आला.
बॉम्बे कॉलनीतील साई मंदिरामध्ये होमहवन सत्यनारायण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. महाआरती नगरसेवक रोहीत काटे व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्या अदिती निकम यांच्या हस्ते करण्यात आली. साईंची पुजा रमेश मोरे यांनी केली. येथील दत्त मंदिरामध्ये सामाजिक कार्यकर्ते वसंत काटे यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले. नगरसेवक रोहित काटे व उद्योजक पांडुरंग नायडू यांनी आरती केली.
पिंपळे गुरव येथील गांगर्डे नगरातील खाडे बाबा मठात ध्वज पूजन व विणा पूजन करण्यात आले. यानंतर समाधी अभिषेक व श्रीहरी बाबा पाद्यपूजा करण्यात आली. होमहवनामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. पालखी, दिंडी सोहळा, श्री राघव चैतन्य बाबांचे प्रवचन, सद्गुरु दर्शन पुस्तक प्रकाशन सोहळा, अग्रपुजा, महाप्रसाद, अनुग्रह तसेच किसन महाराज चौधरी यांचे प्रवचन झाले. प्रसिद्ध चौघडा वादक रमेश पाचंगे व शेखर पाचंगे यांच्या सुरमई चौघडा वादनाने वातावरण आनंदमय झाले होते. तसेच नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. मठात फुलांची सजावट करण्यात आली होती. आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, सागर आंघोळकर, उषा मुंढे, चंदा लोखंडे, स्वाती काटे, माजी नगरसेवक शंकर जगताप, राजेंद्र जगताप, राजेंद्र महाराज, अरुण पवार, विजू जगताप आदी उपस्थित होते.
डायनोमर्क कंपनीतील कामगारांची गुरुपौर्णिमा
भोसरी – एमआयडीसीतील डायनोमर्क कंपनीत विभाग प्रमुख शांताराम पाटील तसेच सर्व कामगारांनी एकत्र येऊन दत्ताची महाआरती केली. अण्णा जोगदंड यांनी गुरुपौर्णिमा का साजरी करतात, याचे महत्त्व सांगितले. प्रत्येक कामगारांनी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांना नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख सूर्यकांत मुळे, विभाग प्रमुख दिलीप इधाते, अक्षरा राउत, प्रवीण बाराथे, मोहन कृष्णन, राजेश वैद्य, हर्षल शेळके, रवी भेंनकी, स्वप्निल देशपांडे, पंडित वनसकर, प्रिया देशमुख, राजेंद्र गोराने, जयंत राऊत, शांताराम पाटील, केतकी राऊत आदी उपस्थित होते.
वेलकम स्कूलला शिवरायांचा पुतळा भेट
मारुंजी – शमीम हुसेन फाउंडेशन संचालित मारुंजी येथील वेलकम स्कूल मध्ये मारुंजीच्या सरपंच पूनम बुचडे यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संभाजी बारणे यांनी शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धकृती पुतळा भेट दिला. या वेळी उपसरपंच संदीप जाधव, शाळेच्या संचालिका शबनम सय्यद, महात्मा फुले सामाजिक समता परिषदचे संस्थापक कलिंदर शेख आदी उपस्थित होते. शिक्षिका नीता वाघोले, पूनम रावन, नाहिद खान आदींनी संयोजन केले.
जैन संघटना विद्यालयात शिक्षकांचा सन्मान
पिंपरी – भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विद्यालययात महर्षि व्यासांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्रीकांत कदम, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, प्रा. संपत गर्जे, प्रा. संजय पवार, प्रा. संतोष गांधी, प्रा. अनुजा गडगे, प्रा. दिलीप सुर्वे, प्रा. प्रतिभा ढोकरे, प्रा. निलीमा ब्रम्हेचा, प्रा. मनोरमा गायकवाड, प्रा. श्रीकांत जाधव, प्रा. हरेल, प्रा. नितीन आखाडे आदी उपस्थित होते. गायत्री खोत या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. साक्षी गुरव यांनी सूत्रसंचालन केले. संगीता करेली यांनी आभार मानले.
ज्ञानदा विद्यालयात विविध कार्यक्रम
चिखली – मोरेवस्ती येथील ज्ञान बालविकास शिक्षण संस्था संचलित ज्ञानदा प्राथमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमास संस्थेचे सचिव लहू कांबळे, अध्यक्ष गोकुळ गायकवाड, शिवाजी घोडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका निता करपे यांनी गोष्टीरुपाने गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. मोनिका सुतार यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक शितल शिंदे यांनी केले. दीपक जरे यांनी आभार मानले. उमेश माने, मिलिंद चोरगे, हिरामण ढाके, दैवशाला चोले, सांगिता शिंदे, सोनाली पेठकर, प्रिया शिंदे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.
प्रतिभा महाविद्यालयात गुरुजनांचे औक्षण
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थिनींनी प्राध्यापकांचे औक्षण केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाली भाषेचे विभागप्रमुख डॉ. महेश देवकर, प्रा. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अरविंद बोरगे, विभाग प्रमुख डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्रा. नव्या दंडवाणी, प्रा. पांडुरंग इंगळे आदी उपस्थित होते. डॉ. महेश देवकर, प्राचार्य डॉ. सांगळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. अरविंद बोरगे यांना केले. सूत्रसंचालन दिव्या साळवे, रसिका बाहेती, आशिष वैद्य यांनी केले. तर आभार क्रीडा अधिकारी आनंद लुंकड यांनी मानले.
आरोग्य सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
महापालिका “ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पिंपळे सौदागर आरोग्य कार्यालय येथे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, आरोग्य सहाय्यक दीपक माकर, आरोग्य मुकादम सुहास सोनसळे यांचा सत्कार संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या आदिती निकम यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय धनवटे, मिलिंद पोत्रे, संतोष कांबळे, शिवाजी माने, सागर शिंदे, अमित कोष्टी, रामा मंजाळ, अमित बेहेनवाल, सिद्धार्थ सातपुते, मारुती अंबवणे, गणेश कार्ले, सुरेश काळभोर, रवींद्र कुदळे, दिलीप कडू, संजय गायकवाड, अनिल रास्ते, शिरीष कोकाटे योगिनी निंबाळकर आदी उपस्थित होते.