वाह.. रोजगारासोबत सोनू सूद देणार मजुरांना हक्काचं घर

मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली.

दरम्यान, आता याच प्रवासी मजुरांना सोनू सूद त्यांचं हक्काचं घर देणार आहे. सोनू ने 20 हजार मजुरांसाठी नोएडामध्ये घर ऑफर केलं आहे. स्वतः सोनू सूदने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

“20 हजार स्थलांतरित मजुरांना मी आता घर ऑफर करत आहे. ज्या मजुरांना नोएडामध्ये काम मिळाले आहे, त्यांना मी घर देऊ इच्छित आहे. नॅशनल असोसिएशन फॉर एलिव्हेशन कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष ललित ठकुराल यांच्या मदतीने हे शक्य होणार आहे’. अश्या आशयाचे ट्विट सोनू सूदने केले आहे.

आजवर कलाविश्वात सोनूच्या वाट्याला जास्तीकरून खलनायकी भूमिकाआल्या. मात्र, मोठ्या पडद्यावरील हा खलनायक खऱ्या आयुष्यात एका सुपरहिरोहून कमी नाही. कारण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू झाला आणि मग स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी धडपडू लागले. वाहतूक बंद असल्याने त्यांनी पायीच आपल्या घरचा रस्ता धरला. त्यावेळी सोनू सूद त्यांच्यासाठी धावून आला आणि या मजुरांना गाडीने त्यांच्या घरी पोहोचवण्याची सोय गेली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.