मुंबई : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत राजस्थानचे आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा अभिनेता सलमान खानच्या बॉडिगार्डसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. यामुळे त्यांच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही पण सलमान खानच्या बॉडिगार्डला भेटायला पुरेसा वेळ आहे असा टोला त्यांना सोशल मीडियाद्वारे लगावले जात आहेत.
डॉ. रघु शर्मा यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करुन सलमान खानच्या बॉडिगार्डला भेटल्याची माहिती दिली. “आज मी गुरमित सिंह जॉली उर्फ शेरा यांची भेट घेतली.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी शेअर केलं होतं. मात्र त्यांचं हे ट्विट पाहून नेटकरी संतापले आहेत.
फ़िल्म अभिनेता श्री सलमान खान के अंगरक्षक शेरा के नाम से प्रसिद्ध श्री गुरमीत सिंह जॉली जी नें निवास पर मुलाकात की। pic.twitter.com/NY7GQTFkhh
— Dr. Raghu Sharma (@RaghusharmaINC) April 24, 2021
“व्वा मंत्रीजी व्वा.. राज्यात कोरोनानं थैमान घातला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक आपल्या समस्या घेऊन तुमच्याकडे येतायेत मात्र त्यांना भेटण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. परंतु सेलिब्रिटींच्या बॉडिगार्डला भेटायला वेळ असतो. त्यांच्या समस्यांकडे तुम्ही जातीनं लक्ष देता.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर आपला संताप व्यक्त केला आहे.
राजस्थान के चिकित्सा मंत्री जी आपको बहुत-बहुत बधाई हो हजारों बार नर्सिंग भर्ती 2013 की बहने आपसे मिली लेकिन आपने एक भी बार उनका जिक्र तक नहीं किया और आज एक अभिनेता का बॉडीगार्ड आपसे मिलने आ गया और आप फुले नहीं समा रहे हो
— Ajit (@Ajit35403784) April 25, 2021
वा मंत्री जी वा मान गये लग रहा है आप #सीएचऒ या #पुलिस_भर्ती_2018 के सम्बंध में इस शेरा से बात कर रहे हैं
समस्या ये है कि ये कोई नाथी का बाड़ा थोड़ी है कि कोरोना चल है और कोई भी जाए— Rajesh Kumar जिलाअध्यक्ष (@Therajesh18) April 24, 2021
गेल्या 24 तासांत करोनाचे 67,160 नवे रुग्ण आढळले असून, 676 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 6 लाख 94 हजार रुग्ण हे उपचाराधीन आहेत. सर्वाधिक 1 लाख 8 हजार रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. मुंबई शहरातील नवे रुग्ण आढळण्याची तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. दिवसभरात मुंबई 5888, नाशिक शहर 2875, उर्वरित नाशिक जिल्हा 1881, नगर जिल्हा 3547, जळगाव 941, पुणे शहर 4118, पिंपरी-चिंचवड 2431, उर्वरित पुणे जिल्हा 3476, सातारा 1912, सोलापूर 1778, सांगली 1305, औरंगाबाद जिल्हा 1684, लातूर 1363, यवतमाळ 1427, नागपूर शहर 5417, उर्वरित नागपूर जिल्हा 2616, चंद्रपूर 1742 नवे रुग्ण आढळले. मृतांमध्ये मुंबई 71, ठाणे जिल्हा 26, रायगड 20, नाशिक विभाग 82, पुणे विभाग 94, मराठवाडा 153, विदर्भ 185 जणांचा समावेश आहे.