मुंबई – मुंबई पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरू करण्यात येईल. मुंबईकर व पर्यटकांना या पुरातन वास्तूची सफर घडविणाऱ्या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी झाले होते. या निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडले आहे.
एकिकडे हेरिटेज वॉक सुरु करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत… दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला “बाजारात” उभी केलीत. वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच.. नीट काळजी घेताय ना? कर्ज रोखेच विकताय ना? 7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना?, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
एकिकडे हेरिटेज वॉक सुरु करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत…
दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला “बाजारात” उभी केलीत.
वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच..नीट काळजी घेताय ना?
कर्ज रोखेच विकताय ना?
7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 31, 2021
दरम्यान, मुंबई महापालिकेचा येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर होणार आहे. करोनामुळे पालिकेचा खर्च वाढला असून टाळेबंदीमुळे उत्पन्न घसरले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प कसा असेल, याबाबतही उत्सुकता सर्वांना आहे.