मुंबई – बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच अभिनेता ‘सलमान खान’चा बहुचर्चित चित्रपट ‘राधे’ चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटातील 2 गाणी रिलीज झाली असून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. दरम्यान, ‘राधे’ या चित्रपटातच्या प्रदर्शनाआधीच भाई जाजने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सलमान खान फिल्म्स आणि झी एन्टरटेन्मेंटने ‘राधे’च्या सर्व माध्यमांमधून होणाऱ्या कमाईचा एक भाग कोरोनाबाधितांसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी देण्याचं ठरवलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे. सलमान खानने यापूर्वी सुद्धा अनेक गरजू नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
‘राधे’च्या प्रदर्शनातून होणाऱ्या कमाईचा एक भाग ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणं खरेदी करण्यासाठी खर्च केला जाईल. सध्या राज्यात आणि देशात कोरोना आवश्यक उपकरणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे दिवसेंदिवस रुग्णसंख्या सुद्धा वेगाने वाढत आहे. आणि अश्यातच सलमान खानने घेलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, राधे चित्रपटात सलमान खान सोबत अभिनेत्री दिशा पाटनी मुख्यभूमीकेत दिसणार आहे. दिशा आणि सलमान यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. या आधी हे दोघंही ‘भारत’ चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं आहे. यात रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.