‘कुली नंबर 1’च्या सेटवर ‘वरून’ झाला जखमी

मुंबई – 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘कुली नंबर 1’चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी, या चित्रपटातील अभिनेता वरून धवनचा फर्स्ट लूक समोर आला होता. यामध्ये वरून बरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन देखील दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

He’s a COOL ?ie बहुत काम कराती हैं yeh Sara Ra

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on


‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे अपडेट नेहमीच वरून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर  करीत असतो. यातच नुकतेच एका स्टंट सीनच्या शूटींगदरम्यान वरून धवन थोडक्यात बचावला. स्टंट सीनच्या शूटींगवेळी गाडी पहाडावर उलटी लटकत असल्याने वरून जखमी झाला. यातच  स्टंट कॉर्डिनेटरने  वरूनला सुरक्षित बाहेर काढल्यावरच सगळ्यांच्या जीवात जीव आला.


दरम्यान,’कुली नंबर 1’ चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. या चित्रपटात वरून धवन आणि अभिनेत्री सारा अली खान ही धमाकेदार जोडी दिसून येणार आहे. ‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन करणार असून, हा त्यांचा 45 वा चित्रपट असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.