….तर लाहोरमध्येही तिरंगा फडकविला असता – भाजप नेता

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाकडून पाकिस्तानमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राईक लोकसभा निवडणुकीदरम्यान महत्वाचा मुद्दा बनला आहे. उत्तरप्रदेशचे भाजप नेते संगीत सोम यांनी एअर स्ट्राईकवर मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय वायुदल जर आणखी थोडा वेळ बालाकोटमध्ये थांबले असते तर लाहोरमध्येही तिरंगा फडकला असता, असे संगीत सोम यांनी म्हंटले आहे. पश्चिम उत्तरप्रदेशामध्ये एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

संगीत सोम म्हणाले कि, आपले वायुदल बालाकोटमध्ये एवढ्या आत होते कि तेथून लाहोर अतिशय जवळ होते. एवढ्या जवळ होते कि अजून दोन मिनिटे वायुदल त्याठिकाणी थांबले असते तर लाहोरमध्येही तिरंगा झेंडा फडकविला असता, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संगीत सोम पश्चिम उत्तरप्रदेशस्थित सराधनामधील आमदार आहेत. ते आपल्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत राहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)