कामगिरी सुधारण्यास वाव – सौरभ वर्मा

माजी राष्ट्रीय विजेता आणि नुकताच रशियन ओपनचा विजेता ठरलेल्या सौरभ म्हणाला की त्याला त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरीत सातत्य ठेवण्यासाठी त्याला त्याची बलस्थाने अधिक मजबूत करावी लागणार आहेत.

रशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा  जिंकल्यानंतर पीटीआयशी बोलताना सौरभ म्हणाला, ” माझ्या कामगिरीत सुधारणा होते आहे, परंतु मला खेळाच्या काही बाबींवर सुधारणेस वाव आहे. माझ्यासाठी पुढची परीक्षा ही आशियायी खेळ असतील आणि त्यात चागली कामगिरी करण्यासाठी मी आत्ताच त्याव्यावर काम करण्यास  सुरुवात केली आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धार येथील या २५ वर्षीय खेळाडूने २०१६ या वर्षात चायनीज तैपाय स्पर्धेचे विजेतेपद तर बिटबर्ग ओपनचे उपविजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याला दुखापतींनी घेरले आणि त्यामुळे त्याला दोन महिने मैदानाबाहेर बसावे लागले.  त्याने  आज ही ७५ हजार अमेरिकन डॉलर बक्षीस असलेली ही स्पर्धा जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)