8 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट
पारगाव शिंगवे (वार्ताहर) – पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा 2020-21 गाळप हंगामाच्या पूर्व तयारीअंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करून जोडणीच्या कामास मिल रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्तेकरण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून नव्या हंगामाच्या तयारीसाठी केलेला हा पहिलाच कार्यक्रम झाला.
कारखान्याच्या 2020-21 गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. हंगामाच्या या आढाव्याबाबत माहिती देताना कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले, येत्या गळीत हंगामाकरीता 8 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक करणेकामी 400 टायर बैलगाडी, 200 ट्रॅक्टर टायरगाडी आणि 250 टोळींसह ट्रक-ट्रॅक्टरचे करार पूर्ण झाले आहेत.
कंत्राटदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 15 ऊस तोडणी यंत्र कंत्राटदारांशी करार झाले आहेत.मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक अशोक घुले, बाबासाहेब खालकर, ज्ञानेश्वर अस्वारे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे आदी उपस्थित होते.