33 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून 2 कोटी युनिट वीज एक्सपोर्ट
अकलूज -येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सह. साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 4 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन संचालक ऍड. मिलींद कुलकर्णी यांच्या हस्ते तर बगॅसवर आधारीत 33 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून एक्सपोर्ट केलेल्या 2 कोटी वीज युनिटचे पूजन संचालक महादेव घाडगे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 चा ऊस गळीत हंगाम 24 नोव्हेंबर 2019 रोजी सुरु झाला असून आज अखेर 4 लाख 2 हजार 386 मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन 4 लाख 7 हजार 500 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.46 टक्के व आजचा साखर उतारा 11.38 टक्के आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये बुधवार अखेर 3 कोटी 61 लाख 59 हजार 761 युनिट वीज निर्माण होऊन 2 कोटी 24 लाख 73 हजार 538 युनिट वीज एक्स्पोर्ट केलेली आहे. डिस्टीलरीमध्ये 36 लाख 14 हजार 922 लिटर रेक्टिफाईड स्पिरीट तसेच 21 लाख 19 हजार 815 लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विद्यमान अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, नामदेव ठवरे, भिमराव काळे, शंकरराव माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, रावसाहेब पराडे, नितीनराजे निंबाळकर, सुरेश पाटील, मारुती घोडके, विनायक केचे, मोहन लोंढे, जयवंत माने-देशमुख, नितीन बेनकर, बाळासाहेब सावंत, संदिपान चव्हाण, प्रशासकीय अधिकारी अभयराजे माने – देशमुख, सर्व सभासद व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. एस. ए. शेखर व सिड प्रो.मॅनेजर एस. एम. देशमुख यांनी स्वागत केले. आबा किर्दकर व लेबर ऑफीसर एफ. एम. गोडसे यांनी आभार मानले.