पुणे – जिल्ह्यातील नमुने तपासणी संख्या वाढवली, सुपर स्प्रेडर सर्वेक्षणही होत आहे, असे असताना ग्रामीणमधील संसर्ग आटोक्यात येत नाही. त्यामुळे आठ दिवसात पुन्हा हॉटस्पॉट गावांच्या संख्येत वाढ झाली आहे.
या आठवड्यात ग्रामीणमधील हॉटस्पॉट गावांच्या संख्येने शंभरीचा आकडा गाठला आहे. त्यामध्ये खेड, बारामती, शिरूड, दौंड या तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट संख्या आहे. दि. 28 एप्रिल रोजी ग्रामीणमधील सर्वाधिक 465 हॉटस्पॉट गावे होती.
दि.14 जुलै रोजी हॉटस्पॉट गावांची संख्या 88 इतकी होती. त्यानंतर आठ दिवसांत 12 ने ही संख्या वाढली आहे. तालुकानिहाय हॉटस्पॉट गावे- जुन्नर – 21, आंबेगाव आणि
पुरंदर प्रत्येकी – 11, शिरूर – 10, बारामती, हवेली आणि खेड प्रत्येकी – 9, दौंड आणि मावळ प्रत्येकी – 7, इंदापूर, भोर आणि मुळशी प्रत्येकी – 2, वेल्हा – एकही नाही.