चिंताजनक! करोनाबाधित पोलिसांच्या संख्येने ओलांडला २० हजारांचा टप्पा

मुंबई : करोना संसर्ग रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरचा करोनाचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांच्या संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये आणखी २४७ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला असून, दोघांचा मृत्यू देखील झाला आहे.

करोनाबाधित पोलिसांची संख्या २० हजार ३ वर पोहचली आहे. यामध्ये ३ हजार ७२८ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर१६ हजार ७१ पोलिस करोनामुक्त झाले असून आतापर्यंत २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती आज महाराष्ट्र पोलिस विभागातर्फे देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.