नगर – जिल्ह्यातील दहा करोनाबाधितांचा आज एकाच दिवशी मृत्यू झाला. करोनामुक्त होण्याचे प्रमाण चिंताजनक स्थितीत घटले असून, मागील दोन दिवसांत दोन हजार 447 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार सुरु असलेली रुग्णसंख्येने आता सव्वा सहा हजारांचा आकडा पार केला आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या एक लाखाकडे वाटचाल करत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात तब्बल एक हजार 205 जणांनी करोनामुळे प्राण सोडला आहे. तथापि, अजुनही करोना विषाणूच्या निर्बंधांचे कठोर पालन होताना दिसून येत नाही. करोना साखळी तोडण्यासाठी आवश्यक असलेले मास्क, सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझरचा वापर होत नसल्याने ही साखळी वाढत चालली असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यात 599 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 85 हजार 652 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 91.86 टक्के इतके झाले आहे. आज एकाच दिवशी जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 1 हजार 100 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 6 हजार 385 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 332, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 395 आणि अँटीजेन चाचणीत 373 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 190, अकोले 11, जामखेड 40, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 15, नेवासा 06, पारनेर 01, पाथर्डी 07, राहता 27, राहुरी 04, संगमनेर 17, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 02, कँटोन्मेंट बोर्ड 02 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 156, अकोले 11, जामखेड 01, कर्जत 04, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 30, नेवासा 06, पारनेर 09, पाथर्डी 06, राहाता 34, राहुरी 16, संगमनेर 41, शेवगाव 10, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 47, कँटोन्मेंट 07 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 373 जण बाधित आढळुन आले. मनपा 53, अकोले 23, जामखेड 30, कर्जत 68, कोपरगाव 07, नगर ग्रामीण 18, नेवासा 12, पारनेर 11, पाथर्डी 14, राहाता 32, राहुरी 45, संगमनेर 14, शेवगाव 05, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 29 आणि कँटोन्मेंट बोर्ड 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 186, अकोले 06, जामखेड 05, कर्जत 20, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 21, नेवासा 22, पारनेर 13, पाथर्डी 34, राहाता 72, राहुरी 33, संगमनेर 29, शेवगाव 29, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 83, कॅन्टोन्मेंट 04 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपडेट्स :
बरे झालेली रुग्ण संख्या : 85652
उपचार सुरू असलेले रूग्ण : 6385
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1205
एकूण रूग्ण संख्या : 93242