नवी दिल्ली : देशातील करोना रुग्ण संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाची देशातील नवी आकडेवारी जाहीर केली आहे. देशात मागील 24 तासांत 2 हजार 710 नवे रुग्ण आढळले असून 14 करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 24 तासांत 2 हजार 296 रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत देशात 4 कोटी 26 लाख 7 हजार 177 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. भारतात 15 हजार 814 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार 296 कोरोना रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात पाच लाखहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या देशातील करोना संसर्गाचा दर 98.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच सक्रिय रुग्णांचा दर 0.04 टक्के आहे. देशातील करोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर 0.58 टक्क्यांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात सध्या एकुण 2 हजार 361 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये एक हजार 658 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्याच्या मागोमाग पुण्यामध्ये 298 सक्रिय रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.