पिंपरी – गेल्या आठ दिवसांपासून शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांचा आलेख खाली येत होता. मात्र आज पुन्हा शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. शहरामध्ये आज 172 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर सात जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 89283 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 172 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज दिवसभरात 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 5 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरात 89283 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 798 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 140 रुग्णांचाही समावेश आहे.
गुरुवारी दिवसभरात शहरात 7 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील चिंचवड, प्राधिकरण, पिंपळे गुरव, पिंपरी येथील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील पिंपळवंडी, नऱ्हे आंबेगाव येथील दोन महिलांचा मृत्यू झाला.