चिंताजनक! महिनाभरात पेट्रोल-डीझेल 6 रुपयांनी महाग

नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी दरवाढीचे सत्र कायम ठेवत सोमवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 29 पैशांची, तर डीझेलच्या दरात 30 पैशांची वाढ केली. त्यामुळे मागील महिन्यापासून आतापर्यंत पेट्रोल 6 रुपयांनी, तर डीझेल 6 रुपये 55 पैशांनी महागले.

सार्वजनिक कंपन्यांनी 18 दिवसांच्या खंडानंतर मागील महिन्यात (4 मे) पहिल्यांदा पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत वाढ केली. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही इंधनांच्या दरांत तब्बल 24 वेळा वाढ झाली. त्या दरवाढीच्या सत्रामुळे पेट्रोल दराने याआधीच महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि लडाखमध्ये 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

ताज्या दरवाढीमुळे हैदराबादमध्येही पेट्रोलने शंभरी ओलांडली. तो टप्पा पार करणारे हैदराबाद हे मुंबईनंतरचे देशातील दुसरे महानगर ठरले आहे.

राजस्थानमध्ये तर डीझेल दरानेही शतक ठोकले आहे. त्या राज्यातील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डीझेलचे दर देशात सर्वांधिक आहेत. ते अनुक्रमे 107 रूपये 53 पैसे आणि 100 रुपये 37 पैसे इतके आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.