चिंताजनक !आता ‘या’ प्राण्यांमध्ये आढळला कोरोनाचा विषाणू

गोरिलाला कोरोनाची लागण होण्याची पहिली घटना

न्युयॉर्क : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगाला धडकी भरली आहे. अशा परिस्थितीत वाघ आणि सिंहानंतर आता आणखी एका प्राण्यांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले असल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. गोरिलादेखील कोरोनाच्या विळख्यात आला आहे. गोरिलाला कोरोनाची लागण होण्याची ही पहिली घटना असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेतील एका प्राणी संग्रहालयातील दोन गोरिलाचे रिपोर्ट चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबऴ उडाली. तर तिसऱ्या गोरिलामध्ये कोरोनाची सर्व लक्षणे आढळून आले आहेत. प्राणी संग्रहालयातील ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्या संपर्गात गोरिला आल्याने त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो झू सफारी पार्कमध्ये दोन गोरिला कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सफारी पार्कचे कार्यकारी संचालक लिसा पीटरसन म्हणाल्या की खोकला आणि श्वासोच्छवासाच्या समस्या या दोन्ही गोरिलांमध्ये आढळून आली होती. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे.

याआधी जुलै 2020 मध्ये शांगो नावाच्या 31 वर्षीय गोरिलाची 26 वर्षीय बार्नी भावासोबत जोरदार लढाई झाली होती. त्यानंतर शांगोमध्ये तापाचे लक्षण दिसून आले. 7 जणांच्या टीमने त्याला पकडून त्याचे कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेतले. शांगोच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा या दोन गोरिला पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.