चिंताजनक! एका दिवसांत 60 हजार करोनाबाधित नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली : देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी 50 हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने याविरूयी माहिती दिली आहे. मागील 24 तासांत देशात 60 हजार 538 नवीन करोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही 20 लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 27 हजार 75 इतकी झाली आहे.

दिलासादायक म्हणजे, देशात आतापर्यंत13 लाखा 78 हजार 106 जणांनी करोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात सहा लाख 7 हजार 384 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशात 41 हजार 585 जणांचा बळी गेला आहे.

जगात ज्या देशांमध्ये करोनाचे रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये 28 लाखांपेक्षा जास्त तर भारतात 20 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात 8 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या 5 लाखांच्या पुढे आहे. मेक्‍सिकोमध्ये 4 लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या 200 पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.