चिंताजनक ! चोवीस तासांत देशात ९७ हजार ८९४ नव्या करोनाबाधितांची नोंद

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाखांच्या पार

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने चांगलाच कहर घातला आहे. त्यातच आता मागील चोवीस तासांत देशात ९७ हजार ८९४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात तब्बल १ हजार १३२ जणांना करोनामुळे मृत्यू झाले आहेत,याविषयीची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाखांच्या पार गेली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मागील चोवीस तासांमध्ये देशात तब्बल ९७ हजार ८९४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर १ हजार १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५१ लाख १८ हजार २५४ इतकी झाली आहे. तर देशात सध्या १० लाख ९ हजार ९७६ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ४० लाख २५ हजार ०८० जणांनी करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत ८३ हजार १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सध्या देशात करोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी देशात तब्बल ११ लाख ३६ हजार ६१३ जणांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात ६ कोटी ५ लाख ६५ हजार ७२८ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.