चिंताजनक! शहरात करोना लसींचा तुटवडा सुरूच

पुणे – एकीकडे करोना बाधित वाढत असताना लसीकरण वेगाने करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ही मोहीम रडतखडत सुरू असल्याचे चित्र आहे.

शनिवारी शहरातील वेगवेगळ्या 17 केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना घरी परतावे लागले आहे.

लसीकरण वेगाने करण्यासाठी सुमारे 160 केंद्र सुरू केली असली, तरी लस नसल्याने दररोज 15 ते 20 केंद्र बंद ठेवण्याची वेळ येत आहे. शनिवारी शहरात 14 हजार 366 जणांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.