चिंताजनक.! बारामतीत कोरोना रुग्णसंख्या त्रिशतकाच्या उंबरठ्यावर

दिवसभरात 280 जणांना बाधा

बारामती ( प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिवसभरात 280 रुग्णांना कोरोना ची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. शहरात १६९ तर ग्रामीण भागात १११ रुग्ण सापडले आहेत.

बारामती शहर व तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या बारामतीकरांच्या चिंतेचा विषय बनला आहे. कुलूपबंद बारामती असली तरीदेखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र रुग्ण संख्या वाढतच आहे.

691 जणांच्या तपासणीत 280 जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.