चिंताजनक..! सातारा जिल्ह्यात 14 जणांचा करोनामुळे मृत्यू

सातारा  -जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 878 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

आजच्या या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 35 (9027), कराड 207 (32134), खंडाळा 36 (12447), खटाव 81 (20726), कोरेगाव 53 (18082),

माण 73 (13906), महाबळेश्‍वर 8 (4421), पाटण 35 (9285), फलटण 79 (29517), सातारा 185 (43158), वाई 78 (13538) व इतर 8 (1529). जिल्ह्यात आजअखेर बाधितांची एकूण संख्या दोन लाख सात हजार 770 इतकी झाली आहे.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या आणि आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 0 (186), कराड 7 (959), खंडाळा 0 (157), खटाव 2 (493),

कोरेगाव 2 (390), माण 0 (288), महाबळेश्‍वर 0 (85), पाटण 0 (312), फलटण 0 (489), सातारा 3 (1274), वाई 0 (310) व इतर 0 (71) असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5014 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.