चिंताजनक..! नगर जिल्ह्यात करोना पुन्हा उद्रेकाच्या दिशेने

नगर – नगर जिल्ह्यात करोनाबाधितांचे रुग्णवाढीचा संख्येमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चढ-उतार होत होता. परंतु आज (मंगळवारी) गेल्या चोवीस तासांत गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक 635 रुग्णसंख्या वाढली आहे.

त्यात पारनेर तालुक्‍यातील रुग्णवाढ कायम असून, या तालुक्‍यात एका दिवसात 136 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे हा तालुका चिंतेचा विषय होत आहे. या तालुक्‍यात प्रशासनाने निर्बंध लादले असले तरी रुग्णवाढ होत आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची तुलनेत रुग्णसंख्या आता वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात रुग्णवाढ ही साडेतीनशे ते पाचशे दरम्यान होती. आज एकाचा दिवसात 365 बाधित आढळले आहे. आज पारनेरला 136 रुग्ण वाढले.

त्यानंतर कर्जतला 83, पाथर्डीला 60, शेवगावला 49 रुग्ण वाढले आहे. या चार तालुक्‍यांमध्ये जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. नगर शहरात 21 रुग्ण वाढले आहेत. नगर तालुक्‍यात 31 रुग्ण वाढले आहेत. पारनेर तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांपासून रुग्ण वाढत आहे.

त्यामुळे या तालुक्‍यांमध्ये प्रशासनाने कडक निर्बंध लावून 21 गावे लॉकडाउन केली आहे. त्यानंतर रुग्णवाढ सुरूच आहे. जिल्ह्यात आज 469 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 76 हजार 999 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.90 टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रुग्णसंख्येत 635 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 866 इतकी झाली आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तब्बल 5998 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात दुसऱ्या लाटेत साडेचारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 45, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 222 आणि अँटीजेन चाचणीत 368 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 10, अकोले 1, जामखेड 1, नगर ग्रामीण 6, नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 13, राहुरी 4, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 3, अकोले 1,

जामखेड 23, कर्जत 30, कोपरगाव 25, नगर ग्रामीण 11, नेवासा 21, पारनेर 2, पाथर्डी 4, राहता 1, राहुरी 19, संगमनेर 16, शेवगाव 40, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 14 आणि इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान, मंगळवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 23, अकोले 13, जामखेड 22, कर्जत 31, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 26, नेवासा 24,

पारनेर 48, पाथर्डी 40, राहता 30, राहुरी 38, संगमनेर 49, शेवगाव 21, श्रीगोंदा 66, श्रीरामपूर 12 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत आज 368 जण बाधित आढळून आले. त्यात नगर शहर 8, अकोले 24, जामखेड 10, कर्जत 53, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 14, नेवासा 10, पारनेर 133, पाथर्डी 43, राहाता 14, राहुरी 2, संगमनेर 5, शेवगाव 9, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 3 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पारनेर तालुक्‍यातील रुग्णवाढ चिंताजनक…
आमदार नीलेश लंके यांच्या कोविड काळातील कामामुळे पारनेर तालुका चर्चेत आला होता. परंतु आता याच तालुक्‍यात वेगाने रुग्णवाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात या तालुक्‍यात दररोज 70 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत.

त्यात आज दुपट्टीपेक्षा जास्त रुग्ण वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा तालुकाच उद्रेकाचा केंद्र बनू पाहत आहे. आमदार नीलेश लंके यांनी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्या ठिकाणी त्यांनी दहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना पुरस्कारही मिळाले.

परंतु आता याच तालुक्‍यात रुग्णवाढ सुरू झाल्याने त्यांच्यावर आता राजकीय आरोप सुरू झाले आहेत. या तालुक्‍यात रुग्ण वाढल्यास जिल्ह्यातील इतर भागात रुग्णवाढू शकतात. या रुग्णवाढीला वेगवेगळी कारणे देण्यात येत आहेत. त्यात मुंबई, पुणे येथील रहिवासी गावे येत असल्याने ही रुग्णवाढ होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.