न्यूयॉर्क : जगात सध्या करोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींची चाचणी घेण्यात येत आहे. दरम्यान, दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशामध्ये चीनच्या सिनोफार्म कोविड १ लसीची चाचणी थांबवण्यात आली आहे. एका गंभीर घटनेनंतर चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या या लसीची चाचणी थांबवण्याचा निर्णय देशातील आरोग्य मंत्रालयाने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
पेरु सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या एका पत्रकानुसार या लसीची चाचणी सुरु असणाऱ्या एका स्वयंसेवकावर लसीचा विपरित परिणाम दिसून आला आहे. त्यानंतर ही चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे. यामागील कारण हे लस नसून अन्य कोणतीतरी गोष्ट असण्याची शक्यात व्यक्त केली जात असली तरी याचा तपास सुरु असल्याने त्यातून समोर येणारी माहित अधिकृत असेल असंही सांगण्यात येत आहे.
सिनोफार्म ही चिनी कंपनी पेरूमध्ये १२ हजार स्वयंसेवकांच्या मदतीने आपल्या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणीच्या लसीकरणाला सुरुवात करणार होती. येथील कायतानो हेरेडिया युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधक असणारे जर्मन मलागा जोकि हे सुद्धा या संशोधनात सहभागी झालेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येचे स्वयंसेवकांना लस देण्याआधी काही स्वयंसेवकांना आधीच लस देण्यात आली. या लसीच्या प्राथमिक साईड इफेक्ट्समध्ये अन्य लक्षणांबरोबच पायांच्या स्नायूंमध्ये कळा येऊन दुखण्याचे लक्षण जाणवले.
अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांना लसीकरण करण्याआधी औषध कंपन्यांना ट्रायल करणं आवश्यक आहे. यामध्ये अगदी मोजक्या स्वयंसेवकांना लस दिली जाते आणि त्याचे काही दुष्परिणाम आहेत हा याची पहाणी केली जाते. याच ट्रायलमध्ये सिनोफार्माच्या लसीचे पुढील लसीकरण थांबवण्यात आलं आहे. “या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे. आम्ही या स्वयंसेवकांना सर्व आवश्यक ती मदत करत असून त्यांना या अडचणीमध्ये पूर्ण सहाय्य केलं जाईल,” असंही जोकि यांनी म्हटल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे. मागील आठवड्यामध्येच संयुक्त अरब अमिरातीमध्ये सिनोफार्मच्या लसीची चाचणी झाली. यामध्ये ही लस स्वयंसेवकांना करोनाच्या संसर्गापासून वाचवण्यात ८६ टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरल्याचं म्हटलं होतं. युएईमधील चाचणीमध्ये ३१ हजार जण सहभागी झाले होते.