चिंताजनक! बिल गेट्‌स यांनी दिला करोनापेक्षाही ‘महाभयंकर’ साथीचा इशारा

लंडन – 2020 हे वर्ष करोनाची साथ अन्‌ लॉकडाऊनने गाजवले. आता 2021मध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती करोनाच्या लसीची. जगभरात लसीकरण मोहीम जोरात आहे. त्यामुळे थोडा दिलासा वाटत असला तरी त्यात आनंद मानायचे कारण नाही का, असा प्रश्‍न आहे.

त्याचे कारण करोनाच्या या साथीपेक्षाही महाभयंकर साथ येऊ शकते, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बिल गेट्‌स यांनी दिला आहे.

डेरेक म्युलर यांचा यूट्यूब चॅनल ‘व्हेरीटाझियम’वर गेट्‌स यांनी नुकतीच मुलाखत दिली. त्यात त्यांनी येत्या काळात आणखी भयंकर साथींना तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. रेस्पिरेटरी व्हायरस, म्हणजे श्वसनातून पसरणाऱ्या व्हायरसमुळे साथीचा धोका अधिक असल्याचं गेट्‌स यांनी म्हटले आहे.

कारण हे व्हायरस उशिरा परिणाम दाखवायला लागतात आणि तोपर्यंत साथ पसरलेली असते. ईबोलासारख्या व्हायरसमध्ये हा धोका नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.