नवी दिल्ली – भारतात ४ लाख १२ हजार ६१८ रुग्ण बाधितांची भर पडली. गेल्या २४ तासात भारतात करोना रुग्णांच्या आकड्याने चिंताजनक विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या २४ तासात ४ लाख १२ हजार ६१८ जणांना करोनाची लागण झाली आहे. भारतातील करोना रुग्णांचा आकडा दुसऱ्यांदा ४ लाखांच्या पार गेला आहे. बुधवारी एका दिवसात ३ हजार ९८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख २९ हजार ११३ जणांनी करोनावर मात केली आहे.
India reports 4,12,262 new #COVID19 cases, 3,29,113 discharges and 3,980 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,10,77,410
Total recoveries: 1,72,80,844
Death toll: 23,01,68
Active cases: 35,66,398Total vaccination: 16,25,13,339 pic.twitter.com/W1kQnSucGe
— ANI (@ANI) May 6, 2021
केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, देशात २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर २३ हजार १६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनाचं संकट दूर करण्यासाठी आतापर्यंत १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९ जणांचं लसीकरण केलं आहे.