चाकण आघाडीवर : 82 गावांत पसरला करोना
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात 24 तासांत पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत बाधितांची संख्या 1494 तर मृतांची संख्या 33 वर पोहोचली असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात दिवसेंदिवस करोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्यांचे वाढ होत आहे. एकीकडे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच्यवेळी तालुक्यात मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. तालुक्यात 24 तासांत खराबवाडीत 41 वर्षीय युवक, नाणेकरवाडीत 45 वर्षीय युवक, वडगाव घेनंद येथे 72 वर्षीय जेष्ठ नागरिक, चाकण नगर परिषद हद्दीत दोघांचा करोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील चाकण नगर परिषदेच्या हद्दीत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 324 बाधित तर 11 जणांचा मृत्यू झाला असून 199 जणांनी करोनावर मात केली असून 114 जणांवर उपचार सुरू आहेत. खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण 11, आळंदी 4, राजगुरूनगर 1 अशा तीन नगर परिषदांमिळून 16 तर ग्रामीण भागातील सोळू (6), खरपुडी बुद्रुक (2), नाणेकरवाडी (1), कडाचीवाडी (3), निघोजे (3),कुरुळी (1). मरकळ (1), दोंदे (1), अशा 8 गावात एकूण 18 व्यक्ती कारोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.