चिंताजनक ! देशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण

६६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

नवी दिल्ली : भारतात  दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३३ हजारांवर पोहचली आहे. तर गेल्या १२ तासांमध्ये भारतात १ हजार २६३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ६६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ३३ हजार ०५० वर पोहचला आहे. कोरोनामुळे आतापार्यंत देशभरात १ हजार ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधित ३३ हजार ०५० रुग्णांपैकी २३ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ८ हजार ३२५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक ४३२ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ९४० वर पोहचला आहे. यामधील ९ हजार ९१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १ हजार ५९३ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाला आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.