अकोला: आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१ अहवाल निगेटीव्ह तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ७५ झाली असून प्रत्यक्षात ५५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण १००९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ९३७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ८६२ अहवाल निगेटीव्ह तर ७५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ७२ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण १००९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८३३, फेरतपासणीचे ९५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९३७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७६१ तर फेरतपासणीचे ९५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८६२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ७५ आहेत. तर आज अखेर ७२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज प्राप्त झालेल्या ३२ अहवालात २१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आता सद्यस्थितीत ७५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील सात जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि आज (रविवार दि.३ मे) दोघांना असे १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ५५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोह.अलि रोड येथील तर उर्वरित पैकी दोन जण बैदपुरा, आणि बाकीचे गुलजारपुरा, पिंजर, खंगनपुरा, कृषीनगर, ताजनगर येथील रहिवासी आहेत.