जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला ‘व्हॉट्‌स ऍप’ नव्हे, तर ‘या’ ऍपची भुरळ

नवी दिल्ली – सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध ऍप व्हॉट्‌स ऍप मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे व्हॉट्‌स ऍपकडून कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये करण्यात आलेले बदल होय. कंपनीची नवीन प्रायव्हसी पॉलिसी येत्या 8 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे. नवीन नियमामुळे वापरकर्त्यांना आपली वैयक्तीक माहिती फेसबुकवर शेअर करावी लागणार आहे. मात्र या व्यतिरिक्त व्हॉट्‌स ऍप सध्या वेगळ्या मुद्दावरून चर्चेत आले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्‌स ऍप वापरत नसल्याचे समोर आले आहे. एलन मस्क यांनी ट्विट करून आपण लोकप्रिय असलेल्या व्हॉट्‌स ऍपचा वापर करत नाही नसून त्याऐवजी आपण सिग्नल या ऍपचा वापर करतो अस सांगितले. अमेरिकेचे उद्योगपती एलन मस्क नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क हे इलेक्‍ट्रीक कार निर्माता कंपनी स्पेस फर्म एक्‍सचे संस्थापक आहेत. त्यांनी लोकांना नुकतेच सिग्नल ऍप वापरण्याचे आवाहन केले आहे.

सिग्नल हे इन्स्टंट मॅसेजिंग ऍप आहे. याला जगातील सर्वात सुरक्षीत ऍप समजले जाते. मजेशीर गोष्ट ही की, सिग्नल ऍपमध्ये देखील व्हॉट्‌स ऍपनेच गुंतवणूक केलेली आहे. एलन मस्क यांच्या ट्विटनंतर लोक सिग्नल ऍप डाउनलोड करत आहेत. गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या या ऍपला साडेचार स्टार मिळाले आहेत. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे.

सिग्नल ऍपमध्ये एक महत्त्वपूर्ण फिचर आहे. या फिचरनुसार तुम्ही ज्या व्यक्तीशी चाट करत आहात, तो व्यक्ती तुमच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. या व्यतिरिक्त सिग्नल ऍपद्वारे यूजर्सचा कोणताही डेटा घेतला जात नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.