केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) – जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती मानल्या जात असलेल्या व्यक्तीचे या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये निधन झाले. केपटाऊनमधील रुग्णालयात टायगरबर्ग नावाच्या विकाराने त्यांच्यावर उपचार सुरू होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी वृत्तसंस्थेला सांगितले. फ्रेडी ब्लोम असे या व्यक्तीचे नाव होते आणि ते 116 वर्षांचे होते.
दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन प्रांतातील ऍडलेड इथे 8 मे 1904 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्म तारखेचे पुरावे असलेली कागदपत्रे त्यांच्या नातेवाईकांकडे उपलब्ध आहेत.
ब्लोम हे आतापर्यंतचे सर्वाधिक वयाचे व्यक्ती असल्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून पडताळणी करण्यात आलेली नाही.
गिनिज बुकमधील नोंदीनुसार व्हायोलेट मोसब्राऊन ही जमैकातील महिला सर्वाधिक वयाची ठरली आहे. वयाच्या 117 व्या वर्षी 15 सप्टेंबर 2017 साली या महिलेचे निधन झाले होते.