झज्जर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मोठा विचार करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आरोग्य सेवा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरू करण्यात आली. आज, हा जगातील सर्वात मोठा हेल्थ कव्हरेज कार्यक्रम आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली.
झज्जर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत एम्स ऑन्कोलॉजी कॉन्क्लेव्ह २०२५’चे उद्घाटन नड्डा यांनी केले. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. नड्डा म्हणाले की, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात हे अभियान आणखी बळकट करून, ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी काहीही असो, आता ५ लाख रुपयांच्या आरोग्य विम्यासाठी पात्र आहेत. अवघ्या सहा वर्षांत, एम्स झज्जर ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा संस्था म्हणून उदयास आली आहे. त्यांनी वैद्यकीय उत्कृष्टतेमध्ये नवीन मानके स्थापित केली आहेत.गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
नड्डा म्हणाले की, गरीब माणसाच्या घरात कर्करोग हा शब्द येताच त्यांची सर्व घरं आणि दुकानं विकली गेली. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना त्याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्या बिचाऱ्या माणसाला कधीच कल्पनाही नव्हती की, त्याला बायपास सर्जरी करावी लागेल. पण, आज हे सर्व शक्य होत आहे. ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ अंतर्गत गरीब लोकांना लाभ मिळत आहेत.
या योजनेअंतर्गत कर्करोगासारख्या आजारांवरही उपचार केले जात आहेत. पुढील तीन वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर स्थापन करण्याची आमची योजना आहे, या वर्षीच २०० सेंटर्स उघडली जातील. या उपक्रमाचा उद्देश आवश्यक कर्करोग सेवा घराजवळ आणणे आहे, विशेषतः वंचित ग्रामीण भागात, असे नड्डा म्हणाले.