एक नवीन मोबाईल लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून या मोबाईलची बॅटर 22 हजार mAh आहे. हा मोबाईल डाॅजी (Doogee) कंपनीचा आहे. या मोबाईलचे फोटो ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. मात्र या फोनची किंमत किती असेल आणि बाजारात कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, डाॅजी कंपनीच्या या नवीन फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसोबत 22 हजार mAh बॅटरी देण्यात येणार आहे. हा फोन जगातील सर्वात जास्त काळ चार्जिंग टिकणारा फोन असणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण वापरानुसार बॅटरी 10 दिवस टिकेल. तसेच स्टॅंडबाय मोड 64 दिवसांचा असेल. बॅटरीचा विचार केल्यास या फोनचे वजन जास्त असल्याची माहिती आहे.
Doogee V Max मोबाईलची लाॅंचिंग डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र लवकरच हा फोन बाजारत उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा मोबाईल क्लासिक ब्लॅक, सनशाइन गोल्ड, मूनशाइन सिल्वर रंगामध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. ऑनलाईन मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाइलफोन 6.58 इंच फुलएचडी IPS डिस्प्ले असेल, स्क्रीन रिफ्रेश रेट120 हर्ट्ज़ इतका असेल. तसेच गोरिल्ला ग्लास स्क्रीन प्रोटेक्शन असले.
डिस्प्लेवर एक नॉच देण्यात आला आहे. 32 मेगापिक्सेल Sony IMX616 90° FOV सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनला मागील पॅनलवर लेदर फिनिश मिळेल आणि त्याची रचना Vertu फोनची झलक असेल. आगामी Doogee V Max मध्ये MediaTek Dimensity 1080 chipset आणि Android 12 सारखे फीचर्स दिले जातील. या हँडसेटमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळेल. फोनमध्ये 108 मेगापिक्सेल प्राइमरी सॅमसंग सेन्सर, 20 मेगापिक्सेल सोनी नाईट व्हिजन कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल.