इंग्लंडमधील बॉम्बस्फोटाचा हा व्हिडीओ पाहिलात?

दुसऱ्या महायुद्धातला जर्मनीचा बॉंब इंग्लंडमध्ये फोडल्याने धमाका

लंडन – कोणतीही युद्धाची अथवा युद्धसदृश परिस्थिती नसताना इंग्लंडमधील एक्‍झेटर येथे एका बॉम्बच्या धमाक्‍याने वातावरणात कानठळ्या बसवणारा आवाज आणि मोठा धूर झाला. हा बॉम्ब आला कुठून?

दुसऱ्या महायुद्धावेळी जर्मन सैन्याने इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी बॉम्बवर्षाव केला होता. त्यातलाच एक जिवंत बॉम्ब शुक्रवारी एक्‍झेटर गावात सापडला. हा बॉम्ब उचलून निकामी करणे (डिफ्युज) अशक्‍य असल्याने या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी आधी हलवण्यात आले. मग रविवारी या बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला.

त्यावेळी प्रचंड मोठा असा कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि स्फोटाच्या ठिकाणी दुमजली बस (डबल डेकर-250 मीटर्स) च्या आकाराचा खड्डा पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.