पिंपरी – येथील डाॅ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डाॅ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी या महाविद्यालयातील कु. फडतरे तुषार संजय (व्दितीय वर्ष बी.ए) व वसेकर निखील सर्जेराव (व्दितीय वर्ष बी.ए) या खेळाडूची जागतिक विद्यापीठ स्पर्धेकरिता आर्चरी या खेळातील (कंम्पाऊंड राऊंड ) या गटामध्ये निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.
ही निवड चाचणी के. आय. आय.टी विद्यापीठ, भुवनेश्वर या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धा दि. 17 मार्च,2021 ते 19 मार्च, 2021 दरम्यान होणार आहेत. निवड झालेल्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष डाॅ. पी.डी. पाटील सर, विश्वस्त डाॅ. स्मितादेवी जाधव व संस्थेचे सचिव डाॅ. सोमनाथ पाटील सर तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ. रणजित पाटील, शारिरीक षिक्षण संचालक डाॅ. ज्ञानेश्वर माने व सुवर्णा घोलप यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.