World’s Most Expensive Mango: कर्नाटकातील उडुपी येथील एका शेतकऱ्याने मियाझाकी या जपानी जातीच्या आंब्याची अनेक झाडे लावली आहेत. या आंब्यांची किंमत सुमारे तीन लाख रुपये किलो आहे. जोसेफ लोबो असे या शेतकऱ्याचे नाव असून ते शंकरपूरचे रहिवासी आहेत. जोसेफ लोबो यांनी त्यांच्या छतावर जपानी आंब्याची दुर्मिळ प्रजाती वाढवण्यात यश मिळवले आहे. बाजारात मिळणाऱ्या इतर आंब्यांपेक्षा हा खूप वेगळा आहे. हे त्याच्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
मियाझाकी हा जगातील सर्वात महाग आंबा असल्याचे म्हटले जाते. जोसेफ लोबो यांनी त्यांच्या घराच्या 1200 स्क्वेअर फूट टेरेसवर आंब्याचे पीक घेतले आहे. त्यांच्या छतावर अनेक झाडे लावलेली आहेत. पण मियाझाकी आंबा हे लक्झरी फळ चर्चेत राहिले आहे. जोसेफ हे भारतातील पहिले शेतकरी आहेत ज्यांनी त्यांच्या छतावर एअर बटाट्यांसह 350 पेक्षा जास्त भाज्या आणि फळे पिकवली आहेत.
जपानचा मियाझाकी आंबा औषधी गुणधर्म आणि गोडपणामुळे महागड्या दराने विकला जातो. हा एक आंबा सुमारे 10 हजार रुपयांना विकला जातो. हा आंबा तीन लाख रुपये किलोपर्यंत विकला जातो. कर्नाटकातील या शेतकऱ्याने 2023 मध्ये मियाझाकी आंब्याची झाडे लावली होती. खराब हवामानामुळे पहिल्यांदा आंब्याचे पीक करपले होते. मात्र यानंतरही लोबो यांनी हार मानली नाही. यानंतर, कठोर परिश्रम करून त्यांनी मियाझाकी आंबे पिकवण्यात यश मिळवले.
लोबोंच्या गच्चीवर आलिशान मियाझाकी आंब्यासोबत ब्राझिलियन चेरी, शंकरपुरा जास्मिन, सीडलेस लिंबू, व्हाईट जावा मनुका यांसारखी महागडी फळे लावली आहेत. यातून लोबो मोठी कमाई करत आहेत. यासोबतच खजूर, काळी मिरी, रुद्राक्ष, कापूर, केळी अशा अनेक औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात आली आहे.
जोसेफ लोबो सांगतात की, जानेवारी महिन्यात पावस झाल्यास मियाझाकी आंब्याची गोडी कमी होते. लोबो पुढे म्हणाले की, त्यांनी आखाती देशांमध्ये पाहून आंब्याची लागवड शिकली आहे. मियाझाकी आंबा कच्चा असताना जांभळ्या रंगाचा असतो. जपानमध्ये हे फळ पिकल्यावर पूर्णपणे लाल होते.