संयुक्‍त राष्ट्राच्या आमसभेसाठी जागतिक नेते अनुपस्थित

महत्त्वाच्या चर्चेसाठी पर्यायी व्यासपीठासाठी चाचपणी केली जाणार

संयुक्‍त राष्ट्रे – संयुक्‍त राष्ट्राच्या स्थापनेपासून यंदा प्रथमच जागतिक नेते सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्‍त राष्ट्राच्या आमसभेसाठी न्यूयॉर्कला जाऊ शकणार नाहीत. संयुक्‍त राष्ट्राच्या आमसभेच्या अध्यक्षांनी आज ही माहिती दिली.

संयुक्‍त राष्ट्राच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त होणारी विशेष आमसभा 15 सप्टेंबरला होण्याची शक्‍यता आहे. या आमसभेमध्येच 22 सप्टेंबरला उच्चस्तरीय चर्चा होणार आहे, यासंदर्भातील वृत्त संयुक्‍त राष्ट्राशी संबंधित संकेतस्थळाने दिले आहे.

यंदाच्या आमसभेसाठी जागतिक नेते एकटे उपस्थित राहू शकणार नाहीत. कोणत्याही देशाचे अध्यक्ष, राष्ट्रपती एकटे प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे कोणीही अध्यक्ष, राष्ट्रपतींनी या काळात प्रवास करून न्यूयॉर्कमधील आमसभेसाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आम्ही करत नाही, असे तिजनी मुहम्मद-बांडे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

जगभरात सुरू असलेल्या कोविड -19 च्या साथीमुळे येत्या काही महिन्यांत संयुक्‍त राष्ट्रांच्या मुख्यालयात व्यक्‍तिगत बैठका होण्याची शक्‍यता फारच कमी आहे. निर्बंधांमुळे जागतिक नेत्यांना काही महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेसाठी काही वेगळ्या व्यासपीठाचा वापर करता येऊ शकेल का, याची चाचपणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.