ऑक्‍सिजन आणि व्हेंटीलेटर्सची ब्रिटनची भारताला मदत

भारताची मदत करणे आमची नैतिक जबाबदारी : स्वान

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी जगभरातील अनेक देश पुढे आले आहेत. यानुसार उत्तर आयरलँडच्या बेलफास्ट येथून 18 टनचे तीन ऑक्सिजन यूनिट (प्लांट) आणि 1,000 व्हेंटिलेटर घेऊन जगातील सर्वात मोठ्या मालवाहक विमानाने भारतासाठी उड्डाण घेतली आहे. ही माहिती ब्रिटिश सरकारने दिली आहे.

विदेश, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) ने म्हटले की, एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर कठोर मेहनत करत एंटोनाव-124 कार्गो प्लेनमध्ये जीवन रक्षक औषध लोड केले. FCDO ने या सप्लायसाठी फंडिंग केली आहे. लोडिंग एअरक्राफ्ट रविवारी (9 मे) सकाळपर्यंत दिल्लीत पोहोचण्याची आशा आहे.

लोडिंगच्या वेळी उत्तर आयरलँडचे आरोग्य मंत्री रोबिन स्वान बेलफास्ट एअरपोर्टवर उपस्थित होते. ते म्हणाले की, ही आमची नैतिक जबाबदारी आहे की, आम्ही भारताला शक्य असेल ती मदत करावी आणि पाठिंबा द्यावा. त्यांनी म्हटले की, ब्रिटेन आणि भारत मिळून या महामारीचा सामना करण्याचे काम करत आहेत. जोपर्यंत आपण सुरक्षित नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही असे ते म्हणाले.

ब्रिटन येथून गेल्या महिन्यात 200 व्हेंटिलेटर आणि 495 ऑक्सिजन कंस्ट्रेटर भारतात पाठवण्यात आले होते. ज्याची फंडिंग FCDO ने केली होती. तसेच ब्रिटेनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी म्हटले होते की, भारतात कोरोनामुळे परिस्थिती खूप दुःखद आहे. आम्ही आमच्या मित्रांसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत. आम्ही या जागतिक महामारीविरोधात एकत्र लढत आहोत. अशा वेळी आम्ही व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेटर आणि दुसरी मदत भारतात पाठवत आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.